आज रंगणार दूसरा टी-20 क्रिकेट सामना

cricket teem

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज दूसरा टी-20 क्रिकेट सामना रंगणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-२० क्रिकेट सामना भारतीय संघातील धडाकेबाज फलंदाज शिखऱ धवनसाठी खास असणार आहे. या सामन्यात शिखर धवनला सात हजारी मनसबदार बनण्याची संधी आहे. शिखर धवनने आतापर्यंत स्थानिक व आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्तरावरील २४६ टी-२० सामन्यांमध्ये ६,९५६ धावा कुटल्या आहेत. ३१.९० च्या सरासरीने त्याने या धावा केल्या आहेत. यात ५३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केलेल्या १३३७ धावांचा समावेश आहे. टी-२० कारकिर्दीत त्याने एकूण ५३ अर्धशतकं ठोकली आहेत. तर, सर्वाधिक ९७ धावा केल्या आहेत. टी-२० मधील ७ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त ४४ धावांची गरज आहे.

Protected Content