‘लिव्ह-इन’चा वाद : कुटुंबाला मारहाण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकाच समुदायाचे तरूण व तरूणी ‘लिव्ह-इन’ मध्ये राहत असल्याच्या वादातून तरूणाच्या कुटुंबाला मारहाण करण्याची घटना घडली असून या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील एका गावात मागील चार महीन्यांपासुन लिव्ह ईन रिलेशनशिप राहणारे एकाच जातीच्या जोडप्यांच्या कुटुंबाला तरुणीच्या संतप्त झालेल्या कुटुंबीयांकडून दिनांक १५ जानेवारी रोजी दुपारी १.३० च्या सुमारास तिन जणांनी तरूणाच्या घरात घुसुन कुटुंबांतील दोन जणांना मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबत घरातील सुमारे पन्नास हजार रूपये किमतीच्या मौल्यवान वस्तुची तोडफोड करीत तरुणांच्या कुटुंबातील काही सदस्यांना मारहाण केल्याची घटनासमोर आली आहे.

या संदर्भात, तरुणाच्या कुंटुब्यांनी याबाबत यावल पोलीस ठाण्यात गावातील पोलीस पाटील यांच्या मदतीने जळगाव येथील राहणार्‍या तरुणीच्या कुटुंबा विरूद्ध तक्रार दिली आहे. या दरम्यान, लिव्ह इन मध्ये राहणार्‍यांच्या तरूणाच्या कुटुंबास मारहाण झाल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना असुन यामुळे मुलाचे कुटुंब भेदरले आहे.

Protected Content