शाह ट्रेडर्सचे साहित्यिक सादरीकरण सन्माननीय काव्य निशिष्ठचे यशस्वी आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शनिवार, 14 डिसेंबर 2024 रोजी, साईनगर गेट येथे मगरीब नमाज नंतर, शाह ट्रेडर्स तर्फे “अब्दुल रहीम रज़ा साहब यांच्या नावाने आणि एक शाम स्वर्गीय अहमद आजीज़ बियावली साहब यांच्या नावाने” सन्माननीय काव्य सम्मेलन आयोजित केले होते. ज्याचे अध्यक्षस्थानी मुश्ताक करीमी होते.

अध्यक्षता राहिल्यानंतर मा. अब्दुल कादीर पटेल यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून मुशायराची सुरुवात केली. साबीर मुस्तफाआबादी यांनी प्रशासकीय जबाबदारी चोख बजावली.या कार्यक्रमाला डॉ. वसीम शाह साहब, इलियास शाह साहब, अकरम देशमुख साहब, इरफान सर साहब, सईद इंजीनियर साहब, फारुख कादीरी साहब हे मुख्य विशेष अतिथी होते.निमंत्रित कवींमध्ये साईद जिलानी, अशफाक निज़ामी, अखलाक निज़ामी, अकरम कुरैशी, ज़मीर हाशमी, हनिफ आदिल, मिर्झा नदीम अफसर, प्रोफेसर इम्रान फारिस, तबरेज़ कामिल, डॉ. फैज़ान उमर, सरफराज़ सैय्यद, फिरोज अकमल यांनी आपली कविता सादर केले.

मुशायरेत हारून उस्मानी साहब, साबीर आफाक साहब, वाहिद गाज़ी साहब, इम्रान उमर साहब हे पाहुणे कवी आले होते.
मुशायरेचे उत्साही शाह ट्रेडर्सचे शाह मसूद साहब, रागिब बियावली साहब, शाह तबरेज़ कामिल, जुनैद मसूद, उबेद शाह यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोठी सेवा केली.

Protected Content