जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत राहणाऱ्या एका तरूणाला दोन जणांकडून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजीत वसंतलाल वलभानी वय ३८ रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अजित याने घराच्या परिसरात राहणारा यश रामचंद्राणी याला बोलावून म्हणाला की, तू आपल्या परिसरातील लोकांना जुआ, पत्ता खेळण्याच्या सवय का लावतो असे सांगितले. याचा राग आल्याने यश रामचंद्राणी आणि त्यांच्या सोबत असलेला यश अग्रवाल या दोघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. यात अजीत याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अजित वलभानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यश रामचंद्राणी आणि यश अग्रवाल दोन्ही रा. सिंधी कॉलनी, जळगाव या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.