जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी उपमहापौर डॉ. अश्वीनभाऊ सोनवणे यांच्या वतीने करण्यात येत असलेल्या मंत्रसिध्द रूद्राक्ष वाटपाला शहरातल्या विविध भागांमध्ये अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.
माजी उपमहापौर तथा भाजपचे नेते डॉ. अश्वीनभाऊ सोनवणे यांच्या वतीने शहरातल्या ठिकठिकाणी खास नेपाळहून मंत्रसिध्द करून आणलेल्या रूद्राक्षांचे भाविकांना मोफत वाटप करण्यात येत आहे. याला नागरिकांचा आणि विशेष करून महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
या अनुषंगाने शहरातील वाघनगर परिसरातल्या जय भवानी महिला मंडळाच्या वतीने अलीकडेच शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कथेच्या सांगता कार्यक्रमाला अश्वीनभाऊ सोनवणे यांच्यातर्फे रूद्राक्षांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक संतोषअप्पा पाटील, डॉ. महेंद्र पाटील, विजय वारूळे आदींसह परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.