अजमेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजमेरमध्ये ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलमधील 6 दोषींना जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्यांना 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने नफीस चिश्ती, नसीम ऊर्फ टारझन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी सहा आरोपी न्यायालयात हजर होते. आरोपींपैकी इक्बाल भाटी याला दिल्लीहून रुग्णवाहिकेतून अजमेरला आणण्यात आले. उर्वरित आरोपी आधीच न्यायालयात होते. या सहा आरोपींविरुद्ध २३ जून २००१ रोजी आरोपपत्र सादर करण्यात आले. याचवर्षी जुलैमध्ये सुनावणी पूर्ण झाली.
१९९२ मध्ये 100 हून अधिक महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करून त्यांचे नग्न फोटो प्रसारित करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात 18 आरोपी होते. 4 जणांना शिक्षा झाली आहे. यातील 4 जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यातच 30 वर्षांपूर्वी एकाने आत्महत्या केली होती. दोन आरोपींविरुद्ध मुलाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला शिक्षा झाली असून दुसऱ्याविरुद्ध खटला सुरू आहे. एक आरोपी फरार असून 6 जणांचा निकाल आज आला आहे.