
जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या खान्देश विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जळगावात माजी नगराध्यक्ष पांडुरंग (बंडू दादा) काळे यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल, कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि विठ्ठल माऊली यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू दादा काळे, महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, विभागीय संयोजक प्रकाश वराडे, पत्रकार अमोल कोल्हे, जिल्हा लेवा पाटीदार मंडळ अध्यक्ष लिलाधर चौधरी, डॉ. ज्योती महाजन, ॲड. डॉ. ज्योती भोळे, नीलिमा राणे, प्राचार्या साधना लोखंडे, मुख्याध्यापिका पुष्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ. मिलिंद पाटील यांनी सरदार पटेल आणि लेवा समाजावर आधारित स्वरचित कविता स्वतःच्या आवाजात सादर केली. त्यांच्या सादरीकरणात निता वराडे, ॲड. डॉ. ज्योती भोळे, नीलिमा राणे आणि साधना लोखंडे यांनीही सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली.
महासंघातर्फे पत्रकार अमोल कोल्हे यांचे “मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाध्यक्ष” म्हणून झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या कार्याचा उल्लेख करत महासंघासाठी नेहमी तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात महिला पदाधिकारींच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. डॉ. ज्योती महाजन यांची महिला ज्येष्ठ सल्लागार, ॲड. डॉ. ज्योती भोळे यांची महिला व कायदेविषयक सल्लागार, नीता वराडे यांची महिला जिल्हा उपाध्यक्ष, साधना लोखंडे यांची जळगाव विभाग महिला संयोजक, तसेच नीलिमा राणे आणि नीला चौधरी यांची संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली.
बंडू दादा काळे यांनी समाजातील एकात्मता व सहकार्यासाठी योग्य दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले. प्रकाश वराडे यांनी समाजातील कन्या भूमिका नेहेते (नाशिक) व भूमिका नेमाडे (डोंबिवली) यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा यशाचा गौरव केला आणि महासंघातर्फे अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला.
महिला विभाग प्रमुख नीता वराडे यांनी महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी लवकरच एकत्रित महिला संमेलन घेण्यात येईल, असे सांगितले. डॉ. मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.



