…तर निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर

यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळमध्ये जनसभेला संबोधित करताना भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष आंबेडकरांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. पुलवामाबद्दल बोलू नका, असे आम्हाला सांगण्यात आले आहे. मात्र आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार घटनेने दिला असताना अशा पद्धतीने का रोखले जाते, असा सवाल विचारात आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असे वादग्रस्त विधान आंबेडकर यांनी केले आहे.

 

आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्यावर बोलू नका, अशी सूचना दिल्यावरुन आंबेडकरांनी आयोगावर घणाघाती हल्ला चढवला. ‘जर घटनेने आम्हाला हवं ते बोलण्याचा अधिकार दिला असेल, तर निवडणूक आयोगाकडून अशा सूचना कशा काय दिल्या जातात, हे जाणून घ्यायला मला आवडेल,’ असे देखील आंबेडकर म्हणाले. तसेच सत्तेत आल्यास निवडणूक आयोगालादेखील सोडणार नाही, असा इशारादेखील त्यांनी दिला. निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नाही. भाजपाचा सहकारी पक्ष म्हणून त्यांचे काम सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला.

Add Comment

Protected Content