निमगाव – राजोरा परिसरात बिबट्याचा वावर : काळजी घेण्याचे वन खात्याचे आवाहन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील राजोरा फाटा परिसरात अनेक नागरिकांना रात्री बिबट्या दिसून आल्याने परिसरात घबराट उडाली आहे. तर, या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल भुसावळ मार्गावरील निमगाव ते राजोरा फाटा परिसरात नागरीकांना रात्री बिबट्याचे दर्शन झाले. निमगाव पासुन तर राजोरा फाटा परिसरात हा प्रकार घडाला. काल रात्रीच्या सुमारास निमगावचे काही तरूण हे शौचालयास गेले असता त्यांना बिबट्या दिसुन आला. बिबटया दिसताच शौचास गेलेल्या तरुणांनी पळ काढला तसेच काही वाहनधारकांना देखील बिबट्याचे दर्शन झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगीतले.

दरम्यान, यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांनी बिबट्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असुन त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दक्षता घेत ,बिबट्याच्या शोधकार्यासाठी पथकाची नेमणुक केली आहे. मागील १५ तासांपासुन बिबट्याचा शोध घेतले जात आहे. दरम्यान यावल हतनुर पाटचारी परिसर ,राजोरा, सांगवी ,बोरावल,टाकरखेडा,निमगाव व आदी ठिकाणाच्या शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी व शेतीकामाला एकटे जावु नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगेर यांनी केले आहे .

बिबटया हा निमगाव राजोरा शिवारातील शेतकर्‍यांना देखील दिसुन आला असुन, एक दिवसापुर्वी बिबटया हा पोलीस व्हॅनला देखील क्रॉस झाल्याची माहिती मिळत आहे. शेळगाव बॅरेज परिसराकडे पाण्याचा मोठा स्रोत असल्याने बिबट्याचा वावर असल्याचे मानले जात आहे. या संदर्भात वन खात्याने परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाईल्ड लँड फाऊंडेशनचे संचालक अजिंक्य भांबुरकर यांच्यासह धनगर, श्री लवटे, श्री.नागरगोजे, गायकवाड, नानसिंग बारेला, गणेश चौधरी आदी कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

Protected Content