धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । धानोरा तसेच पारगाव शिवारात बिबट्या आढळून आल्याने शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, बुधवारी सायंकाळी पारगाव आणि धानोरा येथील शिवारात काही ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ट्रॅक्टरचालक धर्मा नाईक तसेच अन्य काही शेतकर्यांना बिबट्या दिसून आले. परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांनी कामासाठी जातांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.