डॉ. पायल तडवी यांना मूक मोर्चातून आदरांजली

menbatti morcha

यावल प्रतिनिधी । रॅगींग आणि जातीभेदाच्या बळी ठरलेल्या डॉ. पायल तडवी यांना येथील नागरिकांनी मूक मेणबत्ती मोर्चा काढून आदरांजली अर्पण केली.

यावल येथील साहील नगर परिसरातील बिलाल मस्जिद पासुन तर यावल फैजपुर मार्गावरून सदगुरु ऑटो शोरुम जवळ सर्व आदीवासी बांधवांनी सायंकाळी मूक मेणबत्ती मोर्चा काढला. भुसावळ टी पॉईंटवर डॉ.पायल तडवी यांना मेणबत्त्या पेटवुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर प्रस्तुत प्रातिनिधीशी बोलतांना आदीवासी प्रकल्पस्तरीय समितीच्या अध्यक्ष मिना राजू तडवी यांनी आपली प्रतिक्रीया देतांना हा प्रकार अत्यंत संतापजनक व मनाला हेलावणारा असुन, या रॅगिंग प्रकरणाला कंटाळुन मरण पावलेल्या घटनेला मुंबई येथील नायर हॉस्पीटल डीन रत्न पारखी तसेच युनिट लिडर ई. चिंगली यांनी मयत डॉ.पायल तडवी आई सौ. आबेदा तडवी यांनी दिलेल्या रॅगींगच्या तक्रारी कडे कानाडोळा केला नसता तर हा घडला नसता. यासाठी या दोघांनाही देखील मुख्य आरोपी करून गुन्हे दाखल करावे. त्याच बरोबर मिना तडवी यांनी सांगीतले की आपल्या आमदार हरीभाऊ जावळे हे राज्यस्तरिय रॅगींग समितीवर सदस्य म्हणुन कार्यरत असुन, आम्ही त्यांची भेट घेवुन आपल्या राज्यातील रॅगींग विरोधी कायद्याची अधिक प्रभावी अमलबजावणी करण्यासंदर्भात निवेदन देणार आहे. डॉ. पायल तडवी यांची आई ही कॅन्सरची रुग्ण असुन तिचा भाऊ हा अपंग आहे तरी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना डॉ.पायल तडवी च्या कुंटुबास भरीव आर्थिक मदत करावी तसेच डॉ.पायल तडवी च्या अपंग भाऊच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

या मोर्च्यामध्ये आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे राज्य अध्यक्ष एम.बी. तडवी यांच्यासह डॉ. अमीत तडवी, डॉ. फिरोज तडवी, नगरसेविका नौशाद मुबारक तडवी आणि समाजातील अनेक नागरीक याप्रसंगी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content