रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? ; शहरी भागातील अल्पमताधिक्क्यामुळे वाढली चिंता

rohinitai khadse haribhau javale

रावेर (प्रतिनिधी) रावेर-यावल विधासभा मतदार संघातील रावेर,यावल,फैजपुर या तीन प्रमुख शहरांमध्ये यंदाच्या लोकसभेत भाजपाच्या विजयी उमेदवार खा. रक्षाताई खडसे यांना अवघे 2269 मतांचे मताधीक्क्य मिळाले आहे. त्यामुळे भाजपाची शहरी भागातील स्थिती चिंताजनक आहे. दुसरीकडे पुर्वीचा रावेर व आताचा रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात कोणत्याही आमदाराने सतत दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले नाहीय. त्यामुळे प्रत्येक विधानसभेला नविन चेहरा येथून निवडून देणाऱ्या मतदारांचा 2019 मध्ये कोणाला कौल असणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

रावेर लोकसभाच्या निवडणूकीत अभूतपूर्व यशानंतर आता विधानसभेचे वेध लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांना यावल शहरातून 392, रावेर शहरातून 1657 तर फैजपुर शहरातून अवघ्या 220 मतांचा लिड आहे. तर छोट्याशा के-हाळा गावातून भाजपाला 2279 मतांचे मताधिक्क्य आहे. सध्या रावेर-यावल या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाचे आमदार हरिभाऊ जावळे करत असून ते पुन्हा 2019 मध्ये विधासभेवर निवडून जाण्यासाठी येथून इच्छुक आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला या मतदारसंघातून 39329 मतांची लीड मिळाला असला तरी विधानसभेत हेच चित्र कायम ठेवण्यात भाजपाला किती यश येते? हा देखिल महत्वाचा विषय आहे.

भाजपाकडून हे आहे इच्छुक

रावेरमधून भाजपा कडून सध्याच्या स्थितीत आ. हरीभाऊ जावळे इच्छुक आहे. परंतू सलग दहा वर्ष या मतदार संघात कुणीही निवडणून आलेले नाही. त्यामुळे भाजपा पुन्हा हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी देऊन मतदारसंघाची परंपरा तोडणार की, नवीन चेहऱ्याला संधी देणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदार संघातून भाजप पक्ष श्रेष्ठी जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणीताई खेवलकर यांना उमेदवारी देण्याची देखील शक्यता आहे. तसेच डॉ. कुंदन फेगडे,अनिल चौधरी,अतुल पाटील,भरत महाजन,पद्माकर महाजन,सुरेश धनके,डॉ अनंत अकोले,आदी देखील येथून इच्छुक आहेत.

Add Comment

Protected Content