शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । आज शेंदुर्णी येथे सरस्वती विद्या मंदिरात पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना कायद्याचे ज्ञान दिले व त्यांचे सोबत संवाद साधला.
विद्यार्थ्यांशी हितगुज करताना पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सांगितले की, विद्यार्थिनींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे यापुढे टारगटांना घाबरण्याचे कारण नाही कारण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत तुम्हाला कोणी टारगट त्रास देत असेल तर मी तुमचा काका आहे मला थेट फोन करा त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा अशा टारगटांची मी सद्या शोध मोहीम सुरू केली आहे त्यामुळे निश्चिन्त रहा.यावेळी बोलतांना त्यांनी शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या. आपले आई-वडील दिवसभर काबाडकष्ट करतात ते यास करता की मुलांनी शिकून खूप मोठे व्हावे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कष्टाची जाण ठेवावी. त्याच वेळी त्यांना कायद्याचे ज्ञान ही दिले. त्यांचे सोबत शेंदुर्णी आऊट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केले यावेळी मान्यवरांचा सत्कार डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कुमुदिनी साने डॉ. कल्पक साने व ऋचा साने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सरोदे यांनी केले.