जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महापालिकेत कायदेविषयक शिबिर

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज महापालिकेत कर्मचार्‍यांसाठी कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, नागरिकांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यासाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आज महापालिकेत कर्मचार्‍यांसाठी कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.एन. खडसे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त गोसावी, जिल्हा सहकारी वकील ऍड. केतन ढाके यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव ए. ए. के. शेख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, ऍड. निलेश चौधरी आणि विजय दर्जी यांनी विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांना जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी महापालिकेतील सर्व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.एस. मणियार महाविद्यालयाचे विद्यार्थी निलेश बारी, दीपक सोनवणे, मनीष चव्हाण, सागर पाटील, माईसाहेब पाटील, त्रिरश्मी तायडे, साक्षी शर्मा, सायली झोपे, सई जोशी, क्रिष्णल चौधरी, पवन चव्हाण, अतुल उभाळे, राजेश शिंदे आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनिलकुमार चौधरी,आरीफ पिंजारी, कांचन चौधरी, केतकी सावंत, अश्‍वीनी काटोले, योगेश चौधरी, देवेंद्र झांबरे, शिवानी धुप्पड, संजना बारी, स्नेहा नेवे तसेच इतर विद्यार्थी; विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक रवींद्र ठाकूर, कर्मचारी अविनाश कुलकर्णी, प्रमोद पाटील, प्रकाश काजळे, चंद्रवदन भारंबे व गणेश निंबाळकर यांनी सहकार्य केले.

 

Protected Content