जळगाव तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे गावागावात कायदेविषयक जनजागृती

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका विधी सेवा प्राधिकारण यांच्या वतीने व विधी महाविद्यालय यांच्या सहकार्याने न्यायाधिश शेख यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील विविध ठिकाणी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला.

या शिबीरात महीलावरील होणारे अत्याचार, शासनाच्या वतीने विधवा निराधार, जेष्ट नागरीकांना मिळणाऱ्या विविध योजनांची परिपुर्ण माहिती देवुन जनजागृतीसाठी प्रयत्न करणे, महीलांना बचत गटांच्या माध्यमातुन मिळणारे फायदे, खुन करणे किंवा खुन करण्याचे प्रयत्न करणे या विविध विषयांवर उपस्थितांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलीत. यावेळी जळगाव तालुका प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमुर्ती शेख यांनी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तालुक्यातील ममुराबाद, तुरखेडा, विदगाव, रिधूर, पुनमगाव, डिकसाई, म्हसावद येथे शिबीर घेवून मार्गदर्शन करण्यात आले.  शिबीर यशस्वीतेसाठी दिपक सोनवणे, सागर पाटील, मनिष चव्हाण, सुलतान राठोड, अदित्य बैसाने, कृष्णल चौधरी, केतकी सोनवणे, पल्लवी मीसर, सायली झोपे यांच्यासह माणियार महाविद्यालयातील विद्यार्थी, गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Protected Content