मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात शिक्षणपूरक उपक्रम समिती अंतर्गत आज “कथाकथन” या विषयावर प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी कथा म्हणजे काय? कथाकथन उत्तम प्रकारे कसे करावे ? याविषयी सोदाहरण वर्णन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.जी. एस.चव्हाण होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत कथांचे योगदान किती महत्त्वाचे होते ? याविषयी मार्गदर्शन केले.प्रस्तुत कार्यक्रमाला प्रा. पी.पी.लढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. आर.कोळी यांनी केले तर आभार प्रा.नितीन हुसे यांनी मानले.