युवावर्ग आणि महिलांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे मी खूप भारावले – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या चौतीसाव्या दिवशी माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी खामखेडा, मुंढोदे, पुर्नाड आणि उचंदे येथील ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

यावेळी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर,जि प सदस्य निलेश पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील,दशरथ कांडेलकर,राजु भाऊ माळी, प्रदिप साळुंखे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील,यात्रा सहप्रमुख रामभाऊ पाटील, मनिषा ताई देशमुख, आम्रपाली पाटील,संदिप देशमुख,गजमल पाटील,नंदकिशोर हिरोळे, मुन्ना भाऊ बोडे,रविंद्र पाटील,रणजित गोयनका,माणिकराव पाटील, जावजी धनगर, साहेबराव पाटील,बाळाभाऊ भालशंकर,चेतन राजपुत हाशिम शाह फारुख खान ,अयाज पटेल,मयुर साठे,सुशिल भुते,रोहन च-हाटे, बापू ठेलारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

यावेळी रोहिणीताई खडसे संवाद साधताना म्हणाल्या
मतदार संघातील विविध विकास कामाच्या जोरावर जनतेने सलग तिस वर्ष नाथाभाऊंना मतदार संघवासियांनी सलग सहा पंचवार्षिक निवडणुकीतुन विधासभेत पाठवले. भाऊंनी कधीच जाती -पातीचे राजकारण केले नाही. प्रत्येक वेळी फक्त विकासाची स्पर्धा करण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले. ज्या खडसे साहेबांनी भाजपा संघटन मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, त्यांनाच गेल्या निवडणुकीत ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारून मला भाजपाची उमेदवारी दिली, मात्र पक्षातीलच काही विश्वासघातकी लोकांनी केलेल्या दग्या फटक्यामुळे माझा थोड्या मतांनी पराभव झाला. त्या निवडणुकीत मला नव्वद हजार मतदारांनी मतदान करत जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला. दरम्यानच्या काळात पक्षाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मुस्ककटदाबीमुळे भाजपाला सोडचिट्टी देण्याची वेळ नाथाभाऊंवर आली.अहोरात्र परिश्रम करून जिल्ह्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात भाजपा संघटन मजबूत करण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केले, त्याच नाथाभाऊंवर पक्ष सोडण्याची वेळ भाजपने आणली. त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी भाऊंचे राजकीय पुनर्वसन करून विधानपरिषदेवर संधी देऊन आमदारकीची माळ गळ्यात घातली.त्यानंतर जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याचा विडा भाऊंनी उचलला. जनसंवाद यात्रा त्याचाच एक भाग आहे. मतदार संघातील जुन्या -नव्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सांगड घालून संपूर्ण मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवून राष्ट्रवादीचे घड्याळ घराघरात पोहचवण्याचा उद्देश या यात्रेचा आहे,जेणेकरून आदरणीय पवार साहेबांचे हात अधिक मजबूत होतील… त्यासाठी मतदार संघातून घेतलेले 30हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादीचे सभासद व्हा,असे आवाहन रोहिणीताई खडसे यांनी शेमळदा येथे केले.प्रसंगी संवाद यात्रेत सर्वच गावा -गावात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे,यात्रे दरम्यान युवकांकडून केला जाणारा सेल्फीचा आग्रह,जागोजागी सुवासिनीकडून ताईंचे केले जाणारे औक्षण आणि महिलांकडून ताईंना भेटण्यासाठी होत असलेली गर्दी हे संवाद यात्रेची फलश्रुती म्हणावी लागेल.त्यामुळेच विशेषतः युवा वर्ग आणि महिलावर्गाकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे मी खूप भारावले आहे, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा राज्याला प्रेरणादायी – भैय्यासाहेब पाटील.
“सौ रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या संकल्पनेतून सुरु असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रा ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना केवळ मतदारांशी संवाद साधून वैयक्तिक समस्यासह गावोगावच्या अडिअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने सुरु असलेली ही संवाद यात्रा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकटीसाठी दिशा देणारी ठरू शकते. रोहिणी ताईंनी उचललेले हे पाऊल निश्चितपणे अभिनंदनीय आहे. नाथाभाऊंचा विकासाचा वसा घेऊन त्या पुढे जात आहेत.सन 2024मध्ये रोहिणीताईंच आमदार राहतील असा विश्वास व्यक्त करून आगामी निवडणुकीत समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी केला.

विकासासाठी एकत्र या – आमदार एकनाथराव खडसे
गेल्या 30/35वर्षांपासून शांत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात अलीकडच्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गुंडागर्दीने डोके वर काढलेय.अवैध धंदे वाढलेत,विकासाची स्पर्धा न करता या उलट विकास कामासाठी आणलेल्या निधीला स्थगिती देण्याचे काम आमदाराकडून सुरु आहे.गद्दारांना खोके जिव्हारी लागल्याने सुषमा अंधारे ताईंच्या विचार स्वातंत्र्यावर गदा आणली जाऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला.अशा भानगड खोर लोकांना आगामी निवडणुकीत बाजूला सारून विकासासाठी एकत्र या, असे आवाहन आ एकनाथराव खडसे यांनी केले.प्रसंगी मतदार संघातील महाकाय पूल ही संपूर्ण मतदार संघांसाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी खामखेडा येथील तोतारामभाऊ भोलाने, शांतारामजी गवते, मुरलीधर वाघ, गणेश गवते, सरपंच वत्सला ताई सोनवणे, उपसरपंच कृष्णाभाऊ पाटील,सुधाकर वाके, महेंद्र शिरसोदे, जितेंद्र जुमळे, गणेश गावडे, राजु पाटील, सोपान गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गावातील बहुसंख्य युवकांनी एकनाथराव खडसे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला,यात जितेंद्र जुमळे, शंकर जुमळे, लक्ष्मण वाघ, ईश्वर वाघ, नाना जुमळे, श्रावण वाघ, भास्कर जुमळे, किरण वाघ, बापु पाटील, भास्कर वाघ, अनिल वाघ, धनराज जुमळे, तुकाराम पाटील, जगदीश धनगर,राजु पाटील, संजय भोलाने,छगन वाघ,कुंदन वाघ, योगेश भोणे, धनराज मराठे, तुकाराम पाटील, अरुण वाघ, राजू वाघ, अजय शिरसोदे, उमेश शिरसोदे, आदर्श शिरसोदे, रोशन चव्हाण, दिपक शिरसोदे, धम्मपाल शिरसोदे,राहुल वाघ, सुनिल चव्हाण, अमर शिरसोदे,कैलास तायडे, श्रावण शिरसोदे,संघर्ष शिरसोदे, योगेश शिरसोदे,रमेश शिरसोदे,सुरेश शिरसोदे,रितेश शिरसोदे,विनोद शिरसोदे,सचिन इंगळे, अमोल भोलाणे यांचा समावेश आहे

मेंढोदे येथील जावजी धनगर, सोपान कोळी, सुल्तान पठाण, रामकृष्ण धनगर, प्रल्हाद कोळी, रामदास कोळी, भास्कर जोगी, श्रीकृष्ण जोगी, ताहेर पठाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते

उचंदा येथिल माणिकराव पाटील,साहेबराव किसन पाटील, साहेबराव पाटील, रतीराम पाटील, जितेंद्र पाटील, पंडित धनगर, शांताराम सावळे,बंडू पाटील, गोपाळ पाटील, अजाबराव पाटील, मधुकर पाटील, गजमल पाटील, शेषराव पाटील, प्रल्हाद भोलाने, सुरेश भोलाने, पंडित धनगर, जगन्नाथ पाटील, राजु भोलाने,किरण तायडे, प्रकाश पाटील, भिकारी शहा चांद शहा, मोहम्मद सेठ, तुराब मेंबर, सद्दाम शे मोहम्मद शे, प्रदिप पाटील, भुषण पाटील,संजय भोलाने, सुशांत ठाकरे, सारंग पाटील, शे फिरोज, नयुम शहा, समीर मारी, आसिफ, चेतन पाटील,सर्वेश पाटील, भोला पाटील,राहूल तायडे,सुनिल इंगळे, सचिन पाटील, लखन पाटील, अल्ताफ शहा, अल्ताफ बेग आणि ग्रामस्थ उपस्थित होते

पुरनाड येथिल सरपंच मनिषाताई देशमुख,उपसरपंच मिराबाई चौके, ज्ञानेश्वर सपकाळे ,अजाबराव जाधव, बाळू पाटील, चंद्रकांत पाटील, बापु ठेलारी, दादाराव पाटील, प्रदिप पाटील, एकनाथ पाटील, राहुल सोनवणे, मिठाराम ठेलारी, विनोद देशमुख, लक्ष्मण पाटील, साहेबराव पाटील, प्रल्हाद कठोरे, रविंद्र वारूळकार,देवानंद जाधव, राहुल पाटील, सोपान चौके, सागर पाटील, अभिजित सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content