शिरीष चौधरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान

जळगाव, प्रतिनिधी । येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे स्व. लोकसेवक मधुकरराव चौधरी 93 व्या जयंतीचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले.

अमरावती येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे यांनी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी विषयी मार्गदर्शन करून स्वतःचे अनुभव कथन केले. त्यांनी राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायंच असेल तर जिदद, चिकाटी, सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास हे गुण अंगी असेल अत्यंत आवश्यक आहे. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेकरिता मासिक, वर्तमानपत्रे, इंटरनेट चे महत्व विशद केले. तसेच तज्ञ व्यक्तिचे मार्गदर्शन घेण्याचाही सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. अत्यंत हालाखीचा परिस्थितीवर मात करून ज्ञानेश्वर कायंदे यांनी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करून राज्याच्या सेवेमध्ये ते योगदान देत आहेत.

प्राचार्य डाॅ. राजेंद्र वाघुळदे यांनी प्रास्ताविकामध्ये स्व.लोकसेवक मधुुकरराव चौधरी यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वय प्रा. सुनिल पाटील यांनी केले. आभार प्रा. डाॅ. राजकुमार लोखंडे यांनी मानले. प्रविण अंबुसकर, सुशिल झांबरे यांचे तांत्रिक सहाय्य लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्याथ्र्यी, शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content