Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीचा धडक छापा; ७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १८ जणांविरुद्ध...

अमळनेरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर एलसीबीचा धडक छापा; ७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, १८ जणांविरुद्ध गुन्हा

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अमळनेर शहरातील बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर धडक छापा टाकला. या कारवाईत सुमारे ७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १८ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पारधीवाडा परिसरातील मुस्लिम कब्रस्तानाच्या मागील बाजूस आणि जपान जिन परिसरात छापा टाकला. तेथे बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १,५७५ किलो गोमांस, तीन जिवंत बैल तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड, सु-या, कोयते आणि वजन काटे असा एकूण ७ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वॉल्टे, दीपक जगदाळे, पोहेकॉ हरिलाल पाटील, निलेश सोनवणे, रवींद्र पाटील, दीपक माळी, पोकॉ सचिन घुगे, मयूर निकम, राहुल कोळी, विलास गायकवाड तसेच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोउनि शरद काकळीज व पथकाने सहभाग घेतला.


Protected Content

Play sound