एरंडोल प्रतिनिधी । आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिर कामी निधी समर्पण करण्यात येत असून या अभियानाचा एक भाग म्हणून (दि.१५ जानेवारी) रोजी एरंडोल येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला असून हे अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
याप्रसंगी ह.भ.प.राजू महाराज पिंपळकोठे, ह.भ.प.सुनील महाराज विखरण, युवा उद्योजक तथा जिल्हा अभियान समिती सदस्य पंकज काबरा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एरंडोल तालुका पालक नितीन चौधरी, प्रदेश जनजाती क्षेत्र संघटक अॅड.किशोर काळकर,नगराध्यक्ष रमेश परदेशी,एरंडोल तालुका समर्पण अभियान प्रमुख भरत महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोटू महाजन नगर येथे निधी समर्पण कार्यालयाचा शुभारंभ झाला.
सदर कार्यक्रम प्रसंगी शहरातील कार सेवक अॅड.किशोर काळकर,जगदीश ठाकुर,माधव जगताप,सुरेश खुरे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी करासेवकांचे अनुभव सांगताना अॅड. किशोर काळकर यांनी आपल्या कार सेवा काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. जगदीश ठाकूर यांनीदेखील कार सेवा अभियानातील काही ठळक आठवणी विशद केल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप महाजन यांनी केले, प्रास्ताविक अक्षय वंजारी यांनी केले, आभार प्रदर्शन जगदीश ठाकूर यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,राजेंद्र चौधरी,भाजप ओ.बी.सी.मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक कुणाल महाजन, सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ दाभाडे,कृष्णा धनगर,अरुण माळी,डॉ.किशोर पाटील, नगरसेविका आरती महाजन, जयश्री पाटील,शोभना साळी, ग्राहक कल्याण फाउंडेशन अध्यक्षा आरती ठाकूर, सुनील भैया पाटील,अतुल महाजन, आनंदा चौधरी,सुभाष पाटील, डॉ.एन. डी. पाटील, प्रशांत महाजन, निलेश परदेशी या मान्यवरांच्या उपस्थितीत होती. सदर कार्यक्रमात काही दात्यांनी समर्पण निधीत आपण मदत करू असे जाहीर देखील केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
सचिन पानपाटील,विवेक ठाकुर, गौरव वाणी,श्रीकांत कासार, सागर महाजन,शंतनु भेलसेकर, रितेश ठाकरे,निलेश चौधरी, करण पाटील, रोहित भोई,भावेश तिवारी,कृष्णा नेरकर व सर्व रामसेवकांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.