हाथरसच्या आरोपींना फाशी द्या : युवक काँग्रेसची मागणी

यावल प्रतिनिधी । हाथरस येथील भयंकर प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी युवक काँग्रेसतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हाथरस येथे झालेल्या दलित मुलीवर अमानवी सामुहिक अत्याचार व हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ही संपुर्ण देशवासीयांना सुन्न करणारी आहे. ही लाजीरवाणी घटना योगींच्या उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली असुन या घृणास्पद व निंदनीय प्रकारातील आरोपींना योगींचे गुंडाराज सरकार पाठीशी घालवुन वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे असुन उतरप्रदेशातील गुन्हेगारांना पाठीशी घालणार्‍या योगी यांचे सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन उतरप्रदेश मध्ये लावण्यात यावे आणी या संपुर्ण देशाला हादरून सोडणार्‍या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की पिडीत तरूणीच्या कुटुंबास भेटीला जाणार्‍या कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणी उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलीसांनी ज्या पद्धतीने कायदा मोडीत काढून धक्काबुकी केली त्या घटनेचाही जाहीर निषेध करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मधील योगीचे गुंडाराज शासन हे या गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालुन वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसुन येत आहे.  या घटनेतील गुन्हेगार नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्धारे करण्यात आली आहे.

 यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कदीर खान करीम खान यांच्या नेतृत्वाखाली व युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस आदिवासी सेलचे बशीर तडवी , काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे  आणी आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आलेल्या या निवेदनावर युवक काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष खुर्शिद एजाज पिंजारी ( राजु पिंजारी ) आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.