चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा पेटी वाटप अभियाना शुभारंभ

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश; कामगारांना जळगावचा फेरा वाचला

चाळीसगाव प्रतिनिधी । आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयामार्फत कोविड काळात नोंदणी केलेल्या १ हजाराहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा पेटी वाटप अभियानाचा शुभारंभ आज चाळीसगाव येथे करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या “अंत्योदय” जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा लाभ वितरीत करण्यात आला.

सदर सुरक्षा पेटीत 14 प्रकारचे सुरक्षा साहित्य असून कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्याने चाळीसगाव तालुक्यातील 1150 बांधकाम कामगारांना हा लाभ दिला जाणार आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, माजी पं स सदस्य दिनेशभाऊ बोरसे, रिपाई आठवले गटाचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष नगरसेवक आनंद खरात, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा संगीताताई गवळी, नगरसेवक चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, बापू अहिरे, चिराग शेख, जेष्ठ नेते विश्वासभाऊ चव्हाण, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, टाकळी प्रचा माजी सरपंच चंद्रकांत महाजन, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, रोहिणीचे माजी सरपंच अनिल नागरे, राम पाटील, कैलास पाटील, भाजपा सोशल मिडिया तालुकाध्यक्ष बाजीराव अहिरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे, गवळी सर, बांधकाम कामगार योजनेचे समन्वयक तथा चैतन्यतांडा गावाचे सरपंच दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

बांधकाम कामगारांच्या जळगावच्या वाचल्या फेऱ्या, आमदारांनी स्वखर्चाने केली ११५० बांधकाम कामगारांची नोंदणी

बांधकाम कामगार नोंदणीसाठी असणारे कामगार विभागाचे कार्यालय जळगाव येथे असल्याने कामगारांना नोंदणीसाठी चाळीसगाव ते जळगाव व जळगाव ते चाळीसगाव असा २०० किमीचा एका दिवसाचा प्रवास करावा लागत होता. तसेच कोरोना काळात रेल्वे व बस सेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने जाण्या येण्यासाठी कामगारांना हजारोंचा भुर्दंड पडत होता. जळगाव येथे जाऊन देखील त्यादिवशी काम होईलच याची शास्वती नसल्याने अनेकदा कामगारांना २ ते ३ फेऱ्या माराव्या लागत होत्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी कामगारांची ही अडचण ओळखून लॉकडाऊन काळात बांधकाम कामगारांसाठी सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून कार्यालयात सेवा देण्यास सुरुवात केली. यामाध्यमातून आतापर्यंत ११५० नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यात आली. यासाठी  शासकीय नोंदणी पावती ३७ रुपये व सुरक्षा पेटीसाठी १०० रुपये असे एका पेटीसाठी १३७ रुपये असा नोंदणीचे  १ लाख ५७ हजार रुपये आमदार जनसेवा कार्यालयामार्फत भरण्यात येणार आहे. तसेच नोंदणीसाठी जळगाव च्या फेऱ्या वाचल्याने कामगारांचे हजारो मानवी तास व लाखोंचा आर्थिक भुर्दंड वाचला आहे.

 

खाजगी एजंट व ऑनलाईन सेंटरकडून होणारी लुट थांबली

 

बांधकाम कामगार नोंदणीसाठी काही खाजगी ऑनलाईन सेंटर २०० ते ३०० रुपये केवळ ऑनलाईन फॉर्म भरायचे घेतात आणि सुरक्षा पेटी आणून देतो म्हणून काही खाजगी एजंट सक्रीय आहेत ते सरासरी १ हजार रुपये ते २ हजार रुपये गोर गरीब बांधकाम कामगारांकडून घेतात त्या सर्व कामगारांचे मिळून १५ लाख रुपये यामाध्यमातून वाचले आहेत. ज्या बांधकाम कामगारांचे नूतनीकरण झालेले नाही त्यांना राज्य शासनाच्या वतीने कोरोना काळात अनुदान म्हणून ५००० व १५०० रुपये खात्यात जमा झाले नाहीत. नूतनीकरण करण्यासाठी देखील  काही खाजगी ऑनलाईन सेंटर २०० रुपये घेतात. आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात मागील वर्षभरात २५०० हून जास्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे फॉर्म मोफत नूतनीकरण करण्यात आले  त्याचे जवळपास ५ लाख रुपये असा एकूण २० लाख रुपयांचा भुर्दंड  नोंदणी व नूतनीकरणासाठी खाजगी एजंट व ऑनलाईन सेंटर च्या माध्यमातून कामगारांना बसला असता.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!