चाळीसगाव, प्रतिनिधी । सरकारी धोरणानुसार आज १ जून रोजी अनेक जणांचा जन्मदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील ओढरे येथे ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने “जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
तालुक्यातील ओढरे येथील आज १ जून रोजी जास्तीत – जास्त जणांचे जन्मदिवस असल्याने ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी “जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ या अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. अशोक राठोड यांनी हा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. १ जून रोजी गावातील नागरिक भीमा पवार, नवनाथ पवार, उमेश राठोड, परमेश्वर चव्हाण, शांताराम चव्हाण, समाधान चव्हाण, धनराज चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, नवल पवार, ज्ञानेश्वर चव्हाण, कृष्णा राठोड, गौतम पवार, गोरख पवार, शिवानंद राठोड, गोपाल चव्हाण व समाधान राठोड आदींच्या जन्मदिवसानिमित्त हा उपक्रम राबविला गेला होता. वाढदिवस उत्साहात साजरा करताना ‘जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी’ अशी घोषणा देत या अगळ्या वेगळ्या संकल्पनेने पर्यावरणा बदल जनजागृती घडवून आणली. या पर्यावरण स्नेही उपक्रमाकरीता वृक्षमित्र राकेश गवळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या अनोख्या उपक्रमाला घेऊन सर्वत्र कौतुक होत आहे.