श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अतुल लोंढे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कालच्या महाराष्ट्र भूषण प्रदान करण्याच्या कार्यक्रमात मृत झालेल्या श्री सदस्यांच्या प्रकरणात सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे काल केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदानाच्या सोहळ्यात 11 श्रीसदस्यांचा मृत्यू ओढवला असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार रेवदंडा येथील श्री समुदायाचे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. काल या परिसरात सुमारे ३८ अंश सेल्सियस तापमान होते. या कडाक्याच्या उन्हात लक्षावधी श्रीसदस्य सहभागी झाले होते. तर कार्यक्रम संपल्यावर दोन-तीन तासांपर्यंत त्यांना उन्हात उभे रहावे लागले. याचमुळे उष्माघाताच्या फटका लागून ही दुर्घटना घडली.

कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करून म्हटलं की, सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवला. सरकारच्या या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे त्यामुळे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

तर दुसरीकडे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात जावून सर्व माहिती घेतली.

Protected Content