अहमदनगर । नगर जिल्ह्यातील केके रेंज परिसरात लेसर गायडेड अँटी टँक मिसाईलची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली असून यामुळे भारताच्या सामरिक शक्तीमध्ये भर पडणार आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच डीआरडीआने लेझर गाईडेड अँटी टँक मिसाईल या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी केली. अहमदनगरमधील केके रेंज परिसरात एमबीटी अर्जुन टँकवरून याच्यावरून लक्ष्यभेद करण्यात आला. या चाचणी दरम्यान अँटी-टँक क्षेपणास्त्राने तीन किलोमीटर अंतरावर लक्ष्य यशस्वीपणे नष्ट केले.
या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. रजनीथ सिंह यांनी ट्विट केले की, अहमदनगरमधील केके रेंज (एसीसी अँड एस) येथे एमबीटी अर्जुन कडून लेझर-गाईड अँटी-टँक गाईड मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. डीआरडीओ हे सामरिक क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्याचे काम करत असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उधळली आहेत.
हे क्षेपणास्त्र तीन किलोमीटर बसलेल्या टार्गेटला लक्ष्य करू शकते. सध्या एमबीटीचे अर्जुनच्या माध्यमातून याची चाचणी घेण्यात आली आहे. तसेच हे क्षेपणास्त्र हीट (हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट) वॉरहेडच्या माध्यमातून विस्फोटक प्रतिक्रियाशील आर्मर (ईआरए) संरक्षित वाहने उडवतात. याचा अर्थातच सैन्यदलास लाभ होणार आहे.