डीआरडीओची एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था । हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केल्यानंतर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ ) आता एनर्जी वेपनच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. एनर्जी वेपनच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची योजना बनवत आहे. डायरेक्टेड एनर्जी वेपनमध्ये लेझर किरण आणि उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींचा समावेश होतो. हे भविष्यातील युद्ध लढण्याचे तंत्रज्ञान आहे.

ज्यामध्ये मिसाइल, फायटर विमान लेझर किरणं किंवा उच्च क्षमतेच्या स्क्षूम लहरींनी नष्ट करता येईल. अमेरिका, चीन आणि युरोपियन देश हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठया प्रमाणावर मेहनत घेत आहेत. भारतातही या कार्यक्रमावर काम सुरु आहे पण आता त्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येईल.

राष्ट्रीय कार्यक्रमाचे छोटे, मध्यम आणि दीर्घकालीन उद्देश साध्य करण्याचे लक्ष्य असेल. देशांतर्गत उद्योगाच्या मदतीने १०० किलोवॅट पॉवरची वेगवेगळी डायरेक्टेड एनर्जी वेपन विकसित करण्याचे लक्ष्य आहे. केमिकल ऑक्सिजन आयोडाइन, हायपॉवर फायबर लेझर ते गुप्त ‘काली’ प्रोजेक्ट आहे. काली हे पार्टीकल बीम वेपन आहे. काली प्रकल्पातंर्गत शत्रूची येणारी मिसाइल्स आणि फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न आहे.

यातला एकही प्रकल्प कार्यरत होण्याच्या जवळपास नाही. लडाख सीमेवर चीन बरोबर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे डीआरडीओने आतापर्यंत ड्रोन विरोधी सिस्टिम विकसित केली आहे. दोन किलोमीटरच्या रेंजमधील हवाई लक्ष्य भेदण्यासाठी हे १० किलोवॅटचे मशीन सक्षम आहे. डीआरडीओने या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी सुद्धा करुन दाखवली आहे

Protected Content