लाच मागणाऱ्या वरीष्ठ सहाय्यकास 4 वर्षे सक्तमजुरी

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । वडीलांची पेन्शन आईला मिळावी यासाठी 1 हजार रूपयांची लाच घेणाऱ्या पं.स.च्या वरीष्ठ सहाय्यकास जिल्हा सत्र न्यायालयाने 4 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा ठेठावली.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार सुनिल पंढरीनाथ भामरे रा. रांजनगाव ता. चाळीसगाव यांचे मयत वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणारी सेवा निवृत्तीची पेंशन त्याची आईच्या नावे वर्ग होण्यासाठी बँकेला पत्र दिल्याचा मोबदल्यात व केलेल्या कामाच्या मोबदल्यात चाळीसगाव पंचायत समिती सहायक अधिकारी शांताराम गोविंद निकम यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केली होती. लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून 13 ऑगस्ट 2015 रोजी रंगेहात पकडून अटक केली होती. याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. या चार साक्षीदार तपासण्यात आले होते.

याप्रकरणी आज न्यायालयात हजर केले असता, पुरावा, साक्षिदार आणि सरकारी वकील भारती खडसे यांचा युक्तीवाद लक्षात घेवून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय. लाडेकर यांनी आरोपी शांताराम निकम यास लाच मागणी कामी ३ वर्षे सक्त मजुरी व रुपये १,०००/- दंड व
दंड न भरल्यास दोन महीने साधी कैदेची शिक्षा, तसेच लाच स्विकारले प्रकरणी ४ वर्षे सक्तमजुरी व रुपये १,०००/- दंड व दंड न भरल्यास दोन महीने साधीकैदेची शिक्षा ठोठावली, याकामी सरकारतर्फे सरकारी वकील अॅड.भारती  खडसे यांनी काम पाहिले.

Protected Content