पाचोरा प्रतिनिधी । येथे नवीन महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे लोकार्पण सोहळ्याबरोबर विविध विकास कामांचे भूमिपूजन आज दि. 11 सप्टेंबर रोजी आ. किशोर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वच्छ भारत अभियान नागरी अतंर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कामांचे लोकार्पण सोहळा पाचोरा नगर परिषद निधीतून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक सुशोभिकरण व नगरपरिषद निधीअंतर्गत शिवाजी चौकपासून कृष्णापुरी चौफुली रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटार कामांचे भूमिपूजन तसेच नगरपरिषद निधी अंतर्गत मानसिंगका कॉर्नरपासून जारगाव चौफुलीपर्यंत रस्ता रुंदीकरण हे शिवाजी चौकापासून कॉलेज रस्त्याचे भूमिपूजन, नागरिक दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत आदर्शनगर ते पुनगाव रस्ता ते गणेश कॉलनी रस्त्याचे भूमिपूजन व गुरुदत्त नगरमधील खुल्या जागेवर बगिच्या अश्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजी करत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटील, मुकुंद बिल्डीकर, सतीश चेडे, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, पप्पू राजपूत, किशोर बारावकर, जि.प.सदस्य पद्मसिंह पाटील, नगरसेवक डॉ.भरत पाटील, जितेंद्र पेंढारकर, संदीप पाटील यांच्यासह सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.