शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या जिनींग चालकाला अटक

भडगाव प्रतिनिधी | पाचोरा-भडगावसह परिसरातील शेतकर्‍यांची तब्बल १ कोटी ४१ लाख रूपयांची फसवणूक करणारा जिनींग चालक अजय रामेश्‍वर अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे.

पासर्डी येथील मातोश्री जिनिंग प्रेसिंगचा मालक अजय रामेश्वर अग्रवाल ( रा. सेंधवा, मध्यप्रदेश) याने १८ एप्रिल ते १२ जून २०१४ या काळात मातोश्री जिनिंग प्रेसिंग ही फर्म स्थापन करून १४ शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी केला. यात प्रकाश गाडेकर (चिमणापूर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) यांची ७ लाख ७९ हजार रुपये, शिवराम दौलत बोरसे (रा.कोळगाव, ता.भडगाव) यांची यांची ५ लाख २० हजार रुपये, प्रकाश तुकाराम पाटील (रा.नागद, ता.कन्नड) यांची ६ लाख १८ हजार ६५० रुपये, सुभाष मुरलीधर पाटील (रा. जामडी, ता.कन्नड) यांची २ लाख २३ हजार ३०० रुपये, संजय राजाराम जाधव (रा. हातले) यांची ५० हजार रुपये, गोकुळ नथू राठोड (रा. रामेश्वर, ता.पाचोरा) यांची ३ लाख रुपये उदय बापू पाटील (रा.पाचोरा) यांची दोन लाख रुपये, बाबुलाल विष्णू वाणी (रा.सातगाव डोंगरी, ता.) यांची २ लाख ३५ हजार रुपये, रहीम पठाण (रा.जामडी) यांची ६ लाख रुपये, पंकज शिवाजी पवार (रा.दहिवद, ता.चाळीसगाव) यांची १५ लाख ७५ हजार रुपये, नितीन बाबुलाल वाणी यांची २ लाख ५० हजार रुपये, ज्ञानेश्वर शंकर वाणी (रा. सातगाव डोंगरी) यांची १७ लाख रुपये, लक्ष्मण काशिनाथ वाणी (रा.पाचोरा) यांची दोन लाख रुपये, ज्ञानेश्वर विष्णू वाणी (रा. सातगाव डोंगरी) यांची २ लाखांत फसवणूक केली.

या सर्व शेतकर्‍यांना अजय अग्रवाल याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. या संदर्भात संजय समदानी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. तर, पाचोरा येथे एका खटल्यानिमित्त अजय अग्रवाल आला असता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Protected Content