फैजपूर, प्रतिनिधी | ना. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नाने मंजूर रस्तांचे भूमिपूजन आज करण्यात आले. यानिमित्ताने अनेक दिवसांपासून नागरिकांची असलेली मागणी पूर्ण झाली आहे.
यावल भुसावळ राज्य मार्ग ४३ किमी ५ कोटी आणि डोणगाव-इचखेडा-वाघझीरा-वड्री-परसाळे-यावल-अट्रावल-भालोद-आमोदा ११ किमी ३ कोटी या रस्त्यांचे भूमिपूजन ना.हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावल भुसावळ या राज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. ना. जावळे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय यामुळे होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावल नगराध्यक्ष सुरेखा कोळी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, स्वीकृत नगरसेवक डॉं.कुंदन फेगडे, लोकसभा विस्तारक हर्शल पाटील, भाजप सरचिटणीस विलास चौधरी, तालुकाध्यक्ष डॉं. नरेंद्र कोल्हे, सरचिटणीस उज्जैन सिह राजपूत, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, सुनंदा सपकाळे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी मोरे, शहराध्यक्ष बाळू फेगडे, उमेश फेगडे, ज्येष्ठ पदाधिकारी वसंतराव भोसले, रामराव देशमुख, शिरीष देशमुख, प्रमोद नेमाडे, रमेश देशमुख, नारायण चौधरी, डॉं.निलेश गढे, किशोर कुलकर्णी, राकेश फेगडे, धीरज महाजन, गणेश महाजन, किरण चौधरी,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्यने या वेळी उपस्थित होते.