लमांजन येथे प्रचार करणाऱ्या दोघांजवळ बेहिशोबी रक्कम आढळल्याने गुन्हा दाखल

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लमांजन येथे दोन जणांजवळ निवडणुकीचा प्रचार करतांना बेहिशोबी रक्कम आढळून आल्याने शुक्रवारी रात्री खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील लमांजन येथे विरोधी पक्षातील हरीश जगन्नाथ अत्तरदे रा. साळवा ता. धरणगाव आणि राहूल रविंद्र कोल्हे रा.डांभूर्णी ता.यावल हे निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. मात्र या दोन व्यक्तींना काही नागरीकांनी निवडणुकीचा प्रचार करतांना त्यांच्याजवळ रक्कम बेहिशोबी बाळगल्याचा संशय शिवसेनेचे कार्यकर्ते म्हसावद गटाचे जि.प.सदस्य पवन सोनवणे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पवन सोनवणे यांनी निवडणुकीतील भरारी पथकातील अधिकारी अमर मगरी, सुमीत पाटील व सहकारी सहाय्यक खर्च निरीक्षक प्रशांत चाराया यांना माहिती कळविली. सर्वजण घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी हरीश जगन्नाथ अत्तरदे आणि राहूल रविंद्र कोल्हे यांच्याकडे बेहिशोबी 21 हजार रूपयांची रक्कम आढळून आले. दोघा संशयितांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोघांविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.

Protected Content