लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली

रांची वृत्तसंस्था । राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे एक मूत्रपिंड निकामी होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्यावर रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ. उमेश प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लालू यादव यांचे मूत्रपिंड २५ टक्केच कार्यरत आहे. हे मूत्रपिंड कधीही निकामी होऊ शकते.  सध्या त्यांच्या मूत्रपिंडाची परिस्थिती गंभीर आहे.

दरम्यान, लालू प्रसाद यादव सध्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी झारखंड न्यायालयात चारा घोटाळा प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी लालूंच्या वकिलांनी न्यायालयाकडे सहा आठवड्यांचा अवधी मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून लालूंच्या जामिनावर पुढील सुनावणी आता सहा आठवड्यांनंतर होणार आहे.

Protected Content