भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येत्या 27 मार्च रोजी रेल्वे क्रीडांगणावर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे लेडीज इक्वलिटी रनचे आयोजन केले असून सहभागी प्रत्येक स्पर्धकास आयोजकांतर्फे स्वतःचे नाव असलेला विशिष्ट असा बीब क्रमांक, टी-शर्ट व पदकाचे अनावरण करण्यात आले
४००हून अधिक महिलांनी या मध्ये नावनोंदणी केली असून सहभागी प्रत्येक स्पर्धकास आयोजकांतर्फे टी-शर्ट, पदक व स्वतःचे नाव असलेला विशिष्ट असा बीब क्रमांक देण्यात येणार आहे. त्यासाठी आयोजित अनावरण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांची लाभली. यावेळी गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अनघा पाटील, न्यूट्रीमॅक्सच्या मंजुश्री पाटील, सक्षम फाऊंडेशनच्या संचालिका आरती चौधरी, कुशल ऑफसेटच्या संचालिका मंगला पाटील, चतुर्भुज कन्स्ट्रक्शनच्या संचालिका हेमा पाटील, एपीएस फिटनेस झुंबाच्या संचालिका पारुल वर्मा या महिला मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
या लेडीज रनसाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मुख्य प्रायोजक असून साईजीवन सुपर शॉपी, भेल इंडिया लिमिटेड, हॉटेल मल्हार, मनीष मॉल, न्यूट्रीमॅक्स, सुवर्णा सायकल मार्ट, कुशल ऑफसेट, सक्षम फाउँडेशन, चतुर्भुज कन्स्ट्रक्शन, एफएम तडका, एपीएस झुम्बा फिटनेस सहप्रायोजक आहेत. सर्व प्रायोजकांचे आम्ही आभारी असून भविष्यातही भुसावळ रनर्सतर्फे चांगले कार्यक्रम आयोजित केले जातील अशी माहिती संयोजिका डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी दिली.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या रनच्या प्रायोजकांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या हस्ते टी-शर्ट, बीब, पदकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सहभागी लहान मुलींना देखील अनावरण सोहळ्यात सहभागी करून घेतले. भुसावळ शहरात इतक्या मोठ्या संख्येने महिला एकत्र धावतात याचा विशेष आनंद वाटतोय. महिलांचे आरोग्य उत्तम असल्यास संपूर्ण कुटुंब निरोगी व आनंदी असते असे डॉ. केतकी पाटील याप्रसंगी म्हणाल्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना रनसाठी शुभेच्छा दिल्या व इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे कौतुक केले.
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल या रनमध्ये सक्रियपणे सहभागी होईल अशी ग्वाही यावेळी अनघा पाटील यांनी दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पूजा बलके, प्रिया पाटील, संजीवनी लाहोटी, सोनाली वारके, ममता ठाकूर, तृप्ती नगरनाईक, सुवर्णा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील व आभार प्रदर्शन डॉ नीलिमा नेहते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसावल रनर्सच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.