शालेय स्पर्धेत मराठी शाळांचा अभाव खटकणारा – महापौर जयश्री महाजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुब्रतो मुखर्जी अंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी या स्पर्धेत जिल्ह्यातून एकुण १७ संघ सहभागी झाले होते.

 

महापौर जयश्री महाजन यांनी फुटबॉलला कीक मारून व पहिल्या सामन्याचे नाणेफेक करून केले. महापौर जयश्री महाजन यांनी फुटबॉल संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत दिल्या. शिवाय आयोजित स्पर्धेत एकुण १७ संघांपैकी एकही मराठा शाळासह महापालिकेच्या शाळेतील फुटबॉल संघ सहभागी न झाल्याबद्दल महापौर जयश्री महाजन यांनी खंत व्यक्त केली. भविष्यात होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत मराठी शाळा आणि महापालिकेच्या शाळांनी सहभाग नोंदवावा अश्या सुचना शाळाप्रमुखांना देण्यात आली.

 

स्पर्धेचे प्रास्ताविक जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी सादर करताना १७ सहभागी संघा बाबत माहिती विशद केली. तसेच मनपा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या समन्वयाचा अभाव सुद्धा प्रकट केला. तसेच खेळाडूंना महापालिकेच्या वतीने  पारितोषिक देण्यात यावे अशी सुद्धा मागणी केली. याप्रसंगी प्रमुख अतिथींचे स्वागत संघटनेतर्फे फारुक शेख, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, अब्दुल मोहसीन, हिमाली बोरोले यांनी केले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून संघटनेचे सचिव फारुक शेख, मनपा क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे, डॉक्टर अनिता कोल्हे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन व सर्व शाळेचे क्रीडाशिक्षक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अब्दुल मोहसीन यांनी तर आभार क्रीडा अधिकारी भामरे यांनी मानले

Protected Content