पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील जारगाव ग्राम पंचायत हद्दीतील नुरानी नगर भागात घाणीच्या साम्राज्यसह परिसरात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने स्थानिक ग्रामस्थ हैराण झाले आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जारगाव ग्राम पंचायत हद्दीतील नुरानी नगर भागातील वार्ड क्रं. ३ मध्ये येथील सरपंच मुलभूत सुविधा देण्यामध्ये हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा व द्वेष भावना ठेवून जाणुन बुजुन कोणतेही काम करण्यात कचुराई करत आहे. यात घनकचरा, पक्के रस्ते व लाईटची व्यवस्था यापैकी कोणतेही काम ग्रामपंचायत मार्फत होत नाही. रात्री पुर्ण काॅलनी अंधारात असते. सगळीकडे कचराच कचरा पहायला मिळतो. रोडचे कामे झालेली नसल्याने पावळ्यात खड्डे पडलेले असल्यामुळे पाणी साचुन रस्त्याने चालणे देखील मुश्किल होते. या समस्यांबाबत वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करुन सुद्धा कुठलीच कारवाई होत नसल्याने पुन्हा एकदा निवेदनाद्वारे मागणी करत असुन तात्काळ कारवाई न झाल्यास नाईलाजाने मोर्चा व उपोषण करावे लागेल अशा आषयाचे निवेदन ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
निवेदनावर ग्राम पंचायत सदस्य राजु शेख सलीम, नसमी बी मसुद खान, हमीद शाह रशीद शाह, शेख सीराज शेख शब्बीर, अकबर खान नासीर खान, शेख कालु शेख मन्सूर, अर्शद पिंजारी, शेख रफीक शेख गुलाब, शेख जावेद मणियार, सुमय्या देशमुख, शेख हमीद गयामुद्दीन, नौशाद बी. रशिद शाह, आसिफ खान सबदर खान सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.