रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीरावेर तालुक्यातील सहस्रलिंग येथे भाजपचे वैदयकीय आघाडीचे अध्यक्ष कुंदन फेंगडे यांनी आज २२ सप्टेंबर रोजी प्रवासादरम्यान भेट दिली. याप्रसंगी कृ.उ.बा. समिती, रावेरचे सदस्य सिकंदर तडवी, भाजपा बुथ प्रमुख वहाब तडवी, उपसरपंच करीम तडवी, ग्रामपंचायत सदस्य सुलेमान तडवी, यूनूस तडवी, चंद्रमणी तायडे, संजय उर्फ , राजू तडवी, अमजद तडवी, रुबाब तडवी, अरमान तडवी, लुकमान तडवी, कालिंदर तडवी, छबील तडवी, शकील तडवी, राजू तडवी उपस्थित होते.
सहस्रलिंग हे आदिवासींच्या पेसा योजनेतील गाव आहे पण येथील पाझर तलावाचा प्रश्न २००६ पासून प्रलंबित आहे. अपुरा पाणीपुरवठा, पाणीटंचाई, रस्ते, स्ट्रीट लाईट, हे प्रश्न प्रलंबित आहेत. पाझर तलावाला ग्रामस्थांसह भेट देऊन पाहणी केली. भविष्यात आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला.