पहूर. ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या कुंभारी बुद्रुक येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभारी बुद्रुक तालुका जामनेर येथील आसाराम रानु जोशी (वय 58) यांच्यावर बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. त्यातच विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसापासून वसुलीसाठी तगादा लावत होते. तर बँकेचे कर्ज असल्याने या कर्जास कंटाळून शेतकरी आसाराम राणू जोशी वय 58 राहणार कुंभारी बुद्रुक तालुका जामनेर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक असून त्यांना शासनाची कुठली सूट न मिळाल्याने सदर शेतकऱ्याने कर्जास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे, असा मोठा परिवार आहे. पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरी वरून पहूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुरवाडे तपास करीत आहे. सदर घटनेबाबत तहसीलदार साहेब यांना माहिती देण्यात आली आहे.