ग्राहक न्यायालयाचा दणका : मृत तरूणाच्या आईला भरपाई देण्याचे निर्देश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मृत तरूणाच्या विम्याचा क्लेम नाकारणार्‍या कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयाने निर्णय देऊन त्याच्या आईला भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात वृत्त असे की, मंगलाबाई गुलाब ठाकुर (वय ५४, रा. गेंदालाल मिल) या महिलेचा मुलगा मुलगा मुकेश ठाकुर याने २१ जून २०१९ रोजी बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीची लाइफ टाईम सीक्युअर विमा पॉलिसी घेतली होती. त्यापोटी मुकेशने ५३७० रुपये भरले होते. २३ डिसेंबर २०२० रोजी मुकेशचे निधन झाले. त्यानंतर संबधित कंपनीने क्लेम द्यावा अशी विनंती मंगलाबाई यांनी केली. परंतु, त्यांनी मुकेशचा खोटा मृत्यू दाखला सादर केल्याचे कारण सांगत क्लेम नाकारला होता.

दरम्यान, मंगलाबाई ठाकूरयांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचा क्लेम मान्य करुन संबधित कंपनीने पैसे द्यावे असे आदेश केले. याच्या अंतर्गत न्यायालयाने संबधित बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीस १५ लाख रुपये, मानसिक त्रासापोटी १५ हजार व अर्ज खर्चासाठी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. मंगलाबाई ठाकूर यांच्यातर्फे ऍड. विजय महाजन, ऐनपुरकर यांनी बाजू मांडली.

Protected Content