यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्तव्याची जाण व खाकीतील माणुसकी दाखवत पोलीस रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे व त्यांचे सहकारी अंमलदार जितेंद्र राठोड यांच्या तत्परतेने सोशल मीडियाच्या माध्यमातुन वर ७० वर्ष वृद्ध महिलेला २४ तासात तिचा परिवार मिळवून देण्यात यश मिळवल्याबद्दल त्यांचा शाल व फुलगुच्छ देऊन यावल येथील रहिवासी व पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भूषण नगरे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव शहरातील वाल्मीक नगरातील वयोवृद्ध महिला ठकुबाई देवचंद सपकाळे या एकट्याच वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या ते शिरसोली रस्त्याने पायी चालत थेट आदर्श नगर परिसरात गेल्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास वृद्ध महिला एकटीच परिसरात फिरत असल्याचे नागरिकांना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे व त्यांचे सहकारी अमलदार जितेंद्र राठोड यांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यांनी वृद्ध महिलेची चौकशी केली असता त्यांना केवळ त्यांचे नाव सांगता येत होते. आपला पत्ता आणि नातेवाईकांन बद्दल त्यांना विचारले असता त्यांना सांगता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांना महानगरपालिकेच्या श्री संत गाडगे बाबा शहरी बेघर निवास केंद्र येथे दाखल केले. रात्रभर बेघर निवारा केंद्रात वृद्ध महिलेला दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानुसार ठकूबाई यांच्या नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवीत ती वृद्ध महिला आपली नातेवाईक असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार रविवार दुपारच्या सुमारास वृद्ध महिलेला नातेवाईकांना बेघर निवारा केंद्रातून महिलेला ताब्यात घेत घरी नेले. पोलिसांच्या अशा माणुसकी व तत्परतेने २४ तासातच बुद्ध महिलेला त्याच्या परिवारात पोहोचवले. त्याबाबत सर्वत्र जळगाव पोलिसांचे कौतुक केले जात आहे.