कोल्हापुरमधून ‘दबंग ३’ चित्रपटावर बंदी मागणी

dabang3

कोल्हापूर प्रतिनिधी । सलमान खानचा ‘दबंग-३’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ गाण्यावर हिंदू जन जागृती समितीने आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना आज मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

येत्या २० डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सलमानला पुन्हा दबंग अवतारात पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्साही आहेत. मात्र, चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यात साधू- संतांना नाचताना दाखवण्यात आल्यामुळे या गाण्याचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. गाण्यातील एका दृश्यात श्रीकृष्ण, श्रीराम, भगवान शिवची भूमिका केलेले कलाकार अभिनेते सलमान खानचा आशीर्वाद घेताना दाखवले आहे. यामुळे या चित्रपटातील वादग्रस्त दृश्ये वगळावेत, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या विवादाबद्दल बोलताना सलमानने स्पष्टीकरण देत म्हटलं की, ‘असे वाद येत- जात असतात.’ यानंतर वरीना हुसैनकडे पाहत सलमान पुढे म्हणाला की, ‘वरिनाच्या सिनेमाच्या नावावरूनही वाद झाला होता. पण आता सर्व काही शांत आहे.’

Protected Content