मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार इथल्या पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. नाणार आंदोलकांवरील गुन्हे माफीच्या निर्णयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करु, असा शब्द दिला होता. त्यानुसार ठाकरे यांनी काल (2 डिसेंबर) नाणार इथल्या पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात आंदोलनात करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला.दरम्यान, नाणार आंदोलकांवरील गुन्हे माफीच्या निर्णयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे.