यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळन्हावी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर (गोटु) सोळंके व उपाध्यक्षपदी अश्विनी सोळंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे समितीचे सदस्य म्हणून ज्योतीताई सोळंके, सरलाताई सपकाळे, विद्याताई सोळंके, अनिताताई सुरवाडे, ललिताई सोळंके, पितांबर सोळंके, गंगाधर सपकाळे, विकास (गोटु) सोळंके, रेणुका सोळंके, शुभम सोनवणे, सचिव लालचंद साळुंखे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळुंके व उपाध्यक्ष अश्विनी सोळुंके यांचे तसेच सर्व सदस्यांचे स्वागत शाळेच्या वतीने आणि ग्रामपंचायत कोळन्हावी गावाच्या वतीने सरपंच मंजुषा सोळंके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या बैठकीला शाळेतील शिक्षक राजेंद्र साळुंके, प्रमोद रानेराजपुत, शहाजी चौधरी, शीतल बाविस्कर यांच्यासह विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन नारायण कुंभार यांनी केले.