दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून कोहलीची निवड

virat 1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने सोमवारी दशकातील कसोटी संघाची घोषणा केली असून दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड केली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे तीन खेळाडू आहेत तर भारत, श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचे पॉन्टिंगच्या दशकातील टेस्ट संघात प्रत्येकी एक खेळाडू आहे.

या दशकातील (२०१०-२०१९) सर्वोत्तम ११ कसोटीपटूंची यादी रिकी पॉन्टींगने जाहीर केली आहे. या यादीत तब्बल चार कर्णधारांना पसंती दिली आहे. अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) आणि विराट कोहली (भारत) या चार कर्णधारांना त्याने संघात स्थान दिले आहेत. पण त्यापैकी कर्णधार म्हणून पॉन्टिंगने विराटला पसंती दिली आहे. या संघात इंग्लंडचे सर्वाधिक चार खेळाडू इंग्लंडचे आहेत. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, भारत यांचे १-१ खेळाडू आहेत.

संपूर्ण संघ पुढीलप्रमाणे :- डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया),
विराट कोहली (भारत) (कर्णधार), कुमार संगाकारा (श्रीलंका), बेन स्टोक्स (इंग्लंड), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका), नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया), स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) आणि जेम्स अँडरसन (इंग्लंड) यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content