राजीव गांधींची मारेकरी नलिनीला न्यायालयाकडून ३० दिवसांचा पॅरोल मंजूर

1562339892 20 0

 

चेन्नई (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरनला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. नलिनीने आपल्या मुलीच्या विवाहासाठी न्यायालयाकडे सहा महिन्यांच्या पॅरोलची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी उच्च न्यायालयाने नलिनीचा पॅरोल मंजूर केला.

 

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन हिने कोर्टात एक याचिका दाखल करत मुलीच्या लग्नाच्य तयारीसाठी ६ महिन्यांची फर्लो रजा मिळावी अशी मागणी केली होती. नलिनीने कोर्टात याचिका दाखल करत विनंती केली होती की, ती वेल्लोर तुरूंग अधिक्षकांच्या निर्देशानंतरच कोर्टासमोर तिला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून ती स्वत: आपली बाजू कोर्टासमोर मांडू शकेल. कोर्टाने सांगितले होते की, खाजगी प्रकरणात कोर्टासमोर सादर होण्यासाठी नलिनीचा अधिकार आपण नाकारू शकत नाही. रिपोर्टनुसार, नलिनीने कोर्टासमोर आजीवन तुरुंगवासाची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीला २ वर्षांतून एकदा ३० दिवसांची रजा मिळते. तो कायदेशीर हक्क आहे. नलिनीने सांगितले की, ती २७ वर्षांपासून तुरूंगात बंद आहे आणि तिने एकदाही फर्लो रजेसाठी अर्ज केला नाही. त्यामुळे तिला ही सुट्टी मिळणे तिचा हक्क आहे. यावर न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एम निर्मल कुमार यांनी पॅरोल दिला. नलिनीला राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तामिळनाडू सरकारने 24 एप्रिल 2000 रोजी मृत्यूदंड जन्मठेपेत बदलला होता.

Protected Content