आ. किशोर पाटील यांचा ‘तो’ सल्ला त्यांचा अहंकार सिद्ध करणारा : माजी आमदार वाघ

WhatsApp Image 2019 07 28 at 12.40.47 PM

पाचोरा प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील यांनी मी केलेल्या वक्तव्याचा खुलासा करतांंना पुढील सात टर्म मी आराम करावा असा मला दिलेला सल्ला त्यांचा अहंकार सिद्ध करणारा असून त्यांनी आपले पाय जमिनीवर राहू द्यावे त्यांच्या या कार्याला याच निवडणुकीत जनता जनार्दन सडेतोड उत्तर देईल अशा इशारा माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सत्ता येते व जाते व नेतृत्वही बदलते कामेही होतात. आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आमदाराने कामे केले नाहीत व तो जनतेसमोर गेला नाही असे आमदार म्हणतात. म्हणजे त्यांचे काका कै. आर ओ. पाटील यांनी दहा वर्षे काहीच केले नाही असा अर्थ काढायचा का ? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला. ते समाजवादी विचारसरणीच्या वातावरणात वाढले व तीच कृती कायम ठेवली आहे. मतदारसंघात जातीपातीचे राजकारण आ. किशोर पाटील यांनी आणले असल्याचा  असा टोला त्यांनी लागवला.   मी केले मी केले असा टेंभा मिरवत आमदारांनी या अगोदरच्या आमदारांनी काहीच केले नाही असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. हाच धागा पकडत श्री. वाघ यांनी आ. किशोर पाटील यांचे काका कै. आर. ओ. पाटील यांनी देखील काहीच काम केले नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या पाच वर्षात त्यांनी  केलेल्या आंदोलने आमदार विसरले आहेत बोंड आळी अनुदान कर्जमाफी नुकसान भरपाई हल्लाबोल इंधन दरवाढ शेतीमालाला हमीभाव विद्यार्थी शिष्यवृत्ती यासाठी केलेले आंदोलन तसेच त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा समाजाबद्दल जातीवाचक संतापजनक टिप्पणी केल्याने त्यांच्या पुतळ्याचे दहन ही आंदोलने आमदारांनी विसरू नये असा गर्भित इशारा श्री वाघ यांनी दिला.  मी केले मी केले असा टेंभा मिरवत आमदारांनी या अगोदरच्या आमदारांनी काहीच केले नाही असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. एमआयडीसी, खत कारखाना, डॉ. आंबेडकर पुतळा छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग ही कामे कोणी केली हे त्यांनी सांगावे असे स्पष्ट आव्हान केले. भडगाव तालुक्यात माझ्या गाडीत बसायला एकही माणूस नाही पाचोरा तालुक्यात मध्ये अनेक पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत असा कांगावा करणाऱ्या आमदारांनीच तोडफोडीचे राजकारण केले आहे.  पण त्यांनी हे लक्षात असू द्यावे २००९ मध्ये ही स्थिती असताना मी निवडून आलो होतो . तोडफोड व जातीपातीचे राजकारण गर्विष्ठ अहंकारी वृत्ती जनता खपवून घेत नाही त्याचे उत्तर जनता याच निवडणुकीत त्यांना देईल . कुणी आराम करावा व कुणी काम करावे हे जनताच ठरवेल आमदारांनी जनतेला गृहीत धरून  नये कै.सुपडू अण्णा,  कै. के. एम. बापू,  ओंकार आप्पा यांनी  देखील मतदारसंघात कामे केली. विकासाचे वातावरण कायम ठेवले व आमदार म्हणतात इतिहासात कोणीच काम मी केले नाही.  एवढा गर्व त्यांनी जोपासू नये ?  जिल्हाधिकार्‍यांचा आदेश त्यांनी चुकीचा वाटला चुकीचा वाटतो. आता रिंग रोडच्या रस्त्याच्या स्थगितीचा आदेश इथे हे मान्य करायला तयार नाही. न्याय देवतेवर त्यांचा विश्वास नाही. विकासकामांना आमचा विरोध नव्हता व आताही नाही. जे चांगले आहे त्याचे आम्ही स्वागतच केले. चुकीच्या व निकृष्ट कामांबाबत जनतेच्या तक्रारींचे पद्धत व आम्ही करतो विरोधक म्हणून ते आमचे कर्तव्य आहे त्याचे एवढे वाईट वाटून घेणे योग्य नाही. जिल्ह्यात आतापर्यंत अनेकांनी आमदारकी मंत्रीपद भोगले. प्रचंड कामेही केली परंतु कोणीही कार्यसम्राट म्हणून घेतले नाही. आपल्या आमदार स्वयंघोषित कार्यसम्राट म्हणून मिरवून देतात याचे खरोखरच हसू येते. कामे करणे लोकप्रतिनिधींचे काम असते त्याचा एवढा आमदारांनी गर्व जोपासून नये. पाय जमिनीवरच असू द्यावे याचे भान ठेवावे असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Protected Content