पाचोरा शहरात आ.किशोर पाटील यांची कॉर्नर बैठक

kishor patil

 

 

पाचोरा प्रतिनिधी । पाचोर-भडगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा, रीपाइं (आ), शिवसंग्राम, रासप, रयतक्रांती व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. किशोर पाटील यांची प्रचारार्थ पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक 3, 5, 11 येथे कॉर्नर बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

या कॉर्नर बैठकीत उपस्थितीत नागरिकांनी आ.किशोर पाटील यांना बहूमतांनी निवडून देवू असे आश्वासन दिले आहे. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील, उद्योगपती मुकंद बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, कांतीलाल जैन, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, भाजपा शहराध्यक्ष नंदु सोमंवशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवक सतिष चेडे, राम केसवाणी, दादा चौधरी, आनंद पगारे, बापू हटकर, भरत खंडेलवाल, अंकुश कटारे, रवि केसवाणी, नंदू शेलार, हरीभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, युवासेना तालुकाप्रमुख सौरभ चेडे, युवासेना शहरप्रमुख संदीप पाटील, महेश पाटील, तुषार जगताप, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content