आ. किशोर पाटलांचे खंदे समर्थक भाजपमध्ये दाखल : अमोल शिंदेंचा दणका !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप नेते अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांना जोरदार धक्का देत त्यांच्या खंद्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे.

आज जामनेर येथे भडगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे खंदे समर्थक विद्यमान कृ.उ.बा. संचालक तथा नगरसेवक लखिचंद पाटील व राष्ट्रवादीचे सरचिटणीस वडजी येथील प्रगतिशील शेतकरी जगदीश पाटील यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहर व ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत आज जामनेर येथे जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशाने शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यासह माजी आमदार दिलीप वाघ यांना देखील मोठा धक्का मानला आहे. येत्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या प्रवेशाने अमोल शिंदे यांनी आपली बाजू भक्कम केल्याचे मानले जात आहे.

स्व.बापूजी फाउंडेशनच्या माध्यमातून लखिचंद पाटील यांची भडगाव शहरासह ग्रामीण भागात तरुणांची मोठ्या प्रमाणात साखळी तयार केलेली आहे. तसेच कृ.उ.बा. संचालक व भडगाव नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून देखील ते निवडून आलेले आहेत. त्याव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रमात देखील लखीचंद पाटील हे अग्रेसर असतात. लखीचंद पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीचे गणित बदलेल असे मानले जात आहे. तसेच राष्ट्रवादीचे सरचिटणीस जगदीश पाटील यांच्या प्रवेशाने गुडे-वडजी परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार आहे.

दरम्यान, आज माजी नगरसेवक जहांगीर मालचे, शिवसेना उपशहरप्रमुख विनोद राजपुत, युवासेना तालुका संघटक जितेंद्र पाटील, सुरेश सोनवणे, वसिम शेख, किशोर राजपुत, चेतन राजपुत, मुन्ना परदेशी, हर्षल राजपुत, रघुनंदन पाटील, राहुल ठाकरे, चेतन चौधरी, सचिन पवार, प्रथमेश पाटील, राहुल मालचे, सचिन जाधव, लाला परदेशी, नितेश पाटील, राहुल वैद्य, राहुल कासार, राहुल सोनार, सनी पाटील, लक्ष्मीकांत (भैय्या) पाटील, अमोल पाटील, स्वप्निल पाटील, महेश पाटील,ज्ञचेतन काळे, चेतन सोनवणे,राहुल सोनार,आकाश पाटील, दिव्येश कासार, संदीप पाटील, खुशाल महाजन, जयेश पाटील, गोरख सोनवणे, रामू पाटील, भूषण पाटील, अण्णा पाटील, विजय पाटील,भुरा आप्पा,रावसाहेब पाटील, बबलू पाटील, जितू पाटील या पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, पाचोरा-भडगाव भाजपा नेते अमोल शिंदे, भाजपा जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, भडगाव शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, माजी सैनिक आघाडी तालुकाध्यक्ष समाधान पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, शहराध्यक्ष विशाल चौधरी, मुकेश पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content