यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा येथील गावाची संख्या जवळपास पाच हजारापर्यंत पहोचली आहे. मात्र गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन नियमीत साफसफाई होत नसल्यामुळे गावातील मुख्य परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
तसेच गावातील मुख्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळील दर्शनीभागातील गटार मागील गेल्या महिन्यापासून दुर्गंधीच्या पाण्याने भरलेली आहे . गावात काही ठिकाणी गटारीतील घाणीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायतचे दुर्लक्ष करीत आहे .या गटारीच्या वाहत्या पाण्यावरून अनेक वाहने ये जा करतात चुकून जर कुणाच्या अंगावर हे घाणपाणी उडाल्यास मोठा वादविवाद निर्माण होऊ शकतो असे सुज्ञ नागरीकांनमध्ये बोलले जात आहे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील गटारी तुडुंब भरल्याने घाणीच्या पाण्याची दुर्गधी परिसरात सर्वत्र पसरत आहे तर काही गटारीची नियमित साफसफाई होते तर काही ठिकाणी एक ते दिड महिन्यांनी सफाई होत नसल्यामुळे त्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागला असुन त्या परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
आधिच कोरोना संसर्गाच्या महामारीच्या भितीने नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने साडपाण्याचे डबके साचले आहे यातून दुर्गधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे,आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत गावात साफसफाई नियमित करणे गरजेचे आहे नियमित गटारी काढणे पिण्याच्या पाण्यात टि.सी.एल पावडर वापरणे काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज असेल ते दुरुस्त करणे व गावातील सर्वच भागात स्वच्छता अभियान राबवण्यासह गावात डासांचा नायनाट होईल, अशी धुरळणी सह फवारणी करणे गरजेचे आहे तसेच महिला शौचालयाजवळ देखील साफसफाई करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा मोहराळा गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.