कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपेक्षा आज बरे होणार्‍यांची संख्या जास्त !

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात ५६६ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असून ६१० रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा वाढलेला आहे. तर दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. या पार्श्‍वभूमिवर, गेल्या २४ तासांमध्ये बाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या २४ तासात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पुढील प्रमाणे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-१४३; जळगाव ग्रामीण-४६; भुसावळ-३०; अमळनेर-८४; चोपडा-५१; पाचोरा-१०; भडगाव-३६; धरणगाव-२४; यावल-२३; एरंडोल-७; जामनेर-४१; रावेर-१६; पारोळा-२७; चाळीसगाव-१८; मुक्ताईनगर-१०; बोदवड-५ आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील ५ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आजच्या रूग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील आजवरच्या रूग्णांची संख्या २६ हजारांच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंतच्या एकूण रूग्णांची संख्या २६४३९ इतकी झालेली आहे. यातील १८६९८ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून आजच ६१० रूग्णांनी या विषाणूला हरविले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आज ९ रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवरच्या मृतांची संख्या ७९८ इतकी झालेली आहे. तर सध्या जिल्ह्यातील ६९४३ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आलेली आहे.

Protected Content