युद्धाची खुमखुमी, विचार देशाच्या प्रगतीला घातक असतात : उज्ज्वल निकम

 

लातूर (वृत्तसेवा) युद्धाची खुमखुमी, विचार देशाच्या प्रगतीला घातक असतात. युद्ध करणे सोपे नाही, असे परखड मत कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले आहे.

लातूरमध्ये उज्ज्वल निकम यांच्या हस्ते आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘आदर्श नवरत्न’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी निकम यांनी पाकिस्तानसोबत युद्ध करणे योग्य की अयोग्य यासंदर्भात भूमिका मांडली. युद्धाची खुमखुमी, विचार देशाच्या प्रगतीला घातक असतात. युद्ध करणे सोपे नाही, असे त्यांनी सांगितले. भाषणादरम्यान निकम यांनी आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या कामाचेही कौतुक केले. जगात प्रामाणिक माणसे आहेत, पण अनेकदा प्रामाणिकपणाचा अहंकार असतो. मनात अहंकार असल्यास पाय जमिनीवर राहात नाहीत, असे निकम यांनी नमूद केले.

Add Comment

Protected Content